सोलापूर प्रतिनिधी दि 30 जून गावच्या विकासाच्या शासनाच्या अनेक योजना आहेत भागाईवाडी गावच्या सरपंच कविता पाटील यांनी त्याच्या काळात योग्य प्रकारे राबवुन गावचा लौकीक वाढवला.पाच वर्ष परिश्रमाची गगनभरारी विकासाची घेतल्याचे कौतुक माजी आमदार दिलीपराव माने यांनी केले. युवकाचे आयकाँन पृथ्वीराज माने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कविता घोडके पाटील यांनी भागाईवाडी येथे सरपंच पदाचे पाच वर्षाच्या कालावधीत केलेल्या कामाचा अहवाल पुस्तीका व डाँकेमिट्री प्रकाशीत करण्यात आली यावेळी माने बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, पंचायत समिती सदस्य हरीदास शिंदे, माजी उपसभापती संभाजी भडकुंबे, बाबासाहेब पाटील, ब्रह्मदेवदादा माने बँकेचे सरव्यवस्थापक विनोद कुलकर्णी विस्तार अधिकारी अमोल तोडकरी आदि उपस्थित होते.
शासनाच्या गावच्या विकासासाठी अनेक योजना आहेत.त्यासाठी आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव सादर करुन प्रशासनाकडे पाठपुरावा करून मंजुर करुन घेणे.व मंजुर कामे योग्य प्रकारे राबवणे गरजेचे आहे.तरच गावाचा विकास होता भागाईवाडी गावात कविता घोडके पाटील यांनी फार ध्येय व जिद्दीने काम करुन गावास देशपातळीवर लौकीक मिळवुन दिल्याचे दिलीप माने यांनी सांगितले.
गावचा विकास,अभिनव सामाजिक, विधायक उपक्रम,शासनाच्या सर्व योजना राबवून भागाईवाडी गाव व कविता घोडके पाटील स्मार्ट सरपंच ठरल्याचे जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी सांगितले. गावातील नागरिकांनी माझ्यावर सरपंच पदाची जबाबदारी सोपवली पाच वर्षात माझ्या कुवतीनुसार माझ गाव मला अभिमान समजुन काम केले.यासाठी आमचे मार्ग दर्शक दिलीपराव माने, मान्यवर नेते, पदाधिकारी, प्रशासकिय अधिकारी,कर्मचारी, पत्रकार, व नागरीकांचे फार मोठे सहकार्य झाले म्हणूनच माझे भागाईवाडी गाव गुगलवर आले.गावात जीआजवर विकास कामे झाली ती तुमचे सहकार्याने,जी राहीली ती माझ्यामुळे समजून पाच वर्षातील कामाचा अहवाल चरणी सादर करीत असल्याची भावना कविता घोडके पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी तिर्हे सरपंच नेताजी सुरवसे, सुनील जाधव, अजय सोनटक्के,माजी गटविकास अधिकारी वैजिनाथ साबळे,पंचायत समितीचे तालुका संगणक व्यवस्थापक रवी पाटील, आश्लेषा वांगीकर, मंजुश्री भोसले,प्राजक्ता टेकाळे, भैय्या पाटील, तात्या कदम, ग्रामविकास अधिकारी कृष्णात डवले,ग्रामसेविका सुवर्णा घोडके,आदिसह ब्रह्मदेवदादा माने सहकारी बँक परिवार उपस्थित होता.