सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यात डोणगाव रोडवर असलेल्या भोजप्पा तांडा येथे रविकांत राठोड या शेतकऱ्याने तब्बल एक एकर मध्ये कढीपत्त्याची शेती केली आहे. एकदा कढीपत्ता लावला की तो पन्नास वर्ष सतत उत्पादन देणाऱ्या पीक आहे. वर्षाला तीन वेळा मोठ्या प्रमाणावर कडीपत्ता मिळू शकतो. यासाठी फक्त झाडांची छाटणी करणे गरजेचे आहे. शिवाय यामध्ये चुका ,पालक, मेथी अशा कोणत्याही प्रकारची भाजीपाला आंतरपीक म्हणून करू शकतो. पहा ही आगळीवेगळी कढीपत्त्याची शेती