सोलापूर : २३ जून : आज तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन , शिवशक ३४८ प्रारंभ आणि याच निमित्त सोलापूर येथील युवा कलाकार कु.प्रणोती औदुंबर गोरे हिने मेहेंदी आणि रंग यांचा मिलाफ साधून छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द दर्शवणारी कलाकृती साकारली आहे . शिवनेरी किल्ला – जन्मसोहळा , पहिली स्वारी – तोरणगड , कोंढाणा , पुरंदरचा तह , राजगड , रायरीचा किल्ला ( रायगड ) ,शिवराज्याभिषेक , प्रतापगड – अफजलखान वध , लाल महाल – महाराजांनी शाहिस्तेखानची ३ बोटे छाटली , आग्र्याहून मिठाईच्या पेटाऱ्यातून सुटका , सज्जनगड – समर्थ आणि शिवाजी महाराज भेट , या गोष्टी प्रामुख्याने दाखविल्या आहेत . (१९ फेब्रुवारी १६३० ते ६ जून १६७४) हा सुवर्ण कालखंड कलेच्या माध्यमातून रेखाटने म्हणजे मला अभिमान वाटतो असा प्रणोती गोरे यांनी विचार मांडला आहे आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक मनुष्याच्या मनामनात शिवविचार पुन्हा पुन्हा रुजवण्यासाठी ही कल्पना माहितीरुपात मांडण्याचाही प्रयत्न केला आहे . जय भवानी ! जय शिवाजी !
