येस न्युज मराठी नेटवर्क । निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली होती. या भेटीत दोघांमध्ये जवळपास तीन तास वेगवेगळ्या विषयांवर गप्पा रंगल्या होत्या पवार आणि प्रशांत किशोरांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. यावर आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मिश्किल शैलीत प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ट्वीट करत एक चारोळी पोस्ट केली आहे. ‘प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी; 2024 मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी!, नरेंद्र मोदी आहेत आंबेडकरवादी; मग का प्रधानमंत्री बनणार नाहीत नरेंद्र मोदी?’ अशी चारोळी रामदास आठवलेंनी ट्वीट केली आहे. आठवले यांनी केलेल्या या ट्वीटवर रिट्विट आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे.