येस न्युज मराठी नेटवर्क । देशात सध्या करोनाची दुसरी लाट सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकारपरिषद घेत मोदी सरकारवर निशाणा साधला.
यावेळी राहुल गांधी म्हणाले, “अनेकदा सरकारला करोना संदर्भात सतर्क केलं होतं. मात्र सरकारने आमची चेष्टा केली. आणि जसं की तुम्ही पाहिलं पंतप्रधान मोदींनी विजय घोषित केला, करोनाला हरवलं असल्याचं म्हटलं. अडचण ही आहे की, सरकारला व पंतप्रधानांना करोना समजलाच नाही, आजपर्यंत समजला नाही.” तसेच, “करोना केवळ एक आजार नाही, करोना हा बदलत असलेला आजार आहे. जेवढा वेळ तुम्ही त्याला द्याल, जेवढी जागा तुम्ही त्याला द्याल, हा तेवढाच घातक होत जाईल. मी मागील वर्षी फेब्रुवारीत म्हटलं होतं, जागा बंद करा. करोनाला तुम्ही वेळ देऊ नका, जागा देऊ नका, दरवाजा बंद करा.” असंही यावेळी राहुल गांधी म्हणाले.