सोलापूर : मेहुणीच्या घरी सहकुटुंब दक्षिण सोलापूर तालुक्यातील यतनाळ येथे गेले असताना सिद्धरामेश्वर नगर येथील शिवकुमार बिराजदार यांच्या घरातील ५०,००० रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची फिर्याद एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. घराच्या गेटचे तसेच मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कानातील जोड रिंग, कानातील वेल , गळ्यातील सोन्याचा बदाम, सोन्याची अंगठी, कानातील एक जोड कुड्या आणि कानातील रिंग जवळ असा सर्व मिळून ५०,७५० रुपयांचा माल चोरीस गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे हवालदार पवार अधिक तपास करीत आहेत.