सोलापूर : जेवण करून घराला कुलूप लावून गच्चीवर झोपण्यासाठी गेले असताना मित्रनगर शेळगी येथील मलप्पा संगप्पा पट्टणशेट्टी यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने २,११,००० रुपयांचा माल चोरून नेला आहे . मल्प्पा पट्टणशेट्टी यांनी याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सोमवारी २४ मे रोजी रात्री ११ ते मंगळवारी २५ मे सकाळी सहा वाजेपर्यंत ही चोरी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. चोरट्यांनी दीड तोळे वजनाच्या अर्धा तोळ्याच या तीन अंगठ्या ,१२ ग्रॅम वजनाची सोन्याची पिळाची अंगठी, तीन ग्रॅम वजनाची सोन्याची पीळाची अंगठी , सात ग्रॅम वजनाची सोन्याची सोन्याची राशीचा खडा असलेली अंगठी, अर्धा तोळे वजनाचा सोन्याचा बदाम तसेच एक तोळे वजनाचे सोन्याची कानातील कर्णफुले, एक तोळ्याचे मणी मंगळसूत्र २५ हजार रुपये रोख असा २,११,००० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.