येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सोमवारी २४ मे रोजी केलेल्या दंडात्मक कारवाई मध्ये ११ लाख ७५ हजार ५०० रुपये वसूल करण्यात आला आहे . मास्क न वापरणाऱ्या ८७२ व्यक्तींविरुद्ध कारवाई करीत ४,३६,००० रुपये दंड वसूल करण्यात आला सोशल डिस्टंसिंग न पाळल्याने ४९७ व्यक्तींविरुद्ध कारवाई करीत ४९, ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला . पाचपेक्षा अधिक व्यक्ती असल्यामुळे एका आस्थापनेवर कारवाई करीत ५०,००० रुपये दंड करण्यात आला.