येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील covid-19 चा २५ मे रोजी चा अहवाल प्राप्त झाला असून नव्याने ४१ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे . सोमवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासांत शहरातील १०० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. या कालावधीत ६ जणांचा कोरोना मुळे मृत्यू ओढवला आहे.