मुंबई: महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पार पडलेल्या बारावीच्या परीक्षेसंदर्भातील उच्चस्तरीय बैठकीत सहभाग घेतला. ही बैठक सीबीएसईतर्फे बारावीची परीक्षा घ्यावी की न घ्यावी, किंवा कशी घ्यावी याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक होती. या बैठकीत महाराष्ट्र राज्य म्हणून आम्ही सहभाग घेतला. बैठकीत काही पर्यायांवर चर्चा झाली त्याबद्दल मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ बैठकीत बारावीच्या संदर्भात चर्चा करु. बारावीच्या विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षा बघूनचं यासंदर्भातील निर्णय व्हावेत, अशी भूमिका मांडली.
महाराष्ट्रात 14 लाख विद्यार्थी
कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेबद्दल आपल्याला माहिती आहे की, जसं सांगितलं जातेय की तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना जादा धोका असल्याचं वर्तवण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या 14 लाख आहे.तर, सीबीएसईच्या विद्यार्थ्यांची संख्या 25 हजार आहेत. त्यामुळे कोणतीही गोष्ट क करताना सुरुक्षित वातावरणात केली पाहिजे. बारावीची परीक्षा महिनाभरानंतर राज्यातील परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा, अशी विनंती केल्यांचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.