सोलापूर : शिवलिंगप्पा सुतार हे सहकुटुंब मादन हिप्परगा येथे बहिणीच्या गावी गेलेले असताना त्यांच्या शिवलिंग नगर येथील घरामध्ये चोरी झाल्याची फिर्याद एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे . अज्ञात चोरट्याने सुतार यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटून घरातील हॉलमधील कपाटा मधील चार हजार रुपये रोख तसेच बेस्टोन कंपनीचा रंगीत टीव्ही आणि बँक ऑफ बडोदा चे एटीएम कार्ड , सुतार यांच्या पत्नीचे एसबीआय बँकेचे एटीएम कार्ड चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे हवालदार पवार तपास करीत आहेत.