येस न्युज मराठी नेटवर्क : मार्कंडेय सहकारी रुग्णालयातील आय. सी. यु. डी. वॉर्डातील बेड क्रमांक दोन जवळ चार्जिंगसाठी लावलेले दोन मोबाईल चोरीस गेल्याची फिर्याद जेलरोड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. उस्मानाबाद येथील चंद्रकांत शामराव कानडे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. यातील एक मोबाईल ४५,००० रुपयांचा आणि दुसरा मोबाईल ५,००० रुपयांचा होता. चोरीस गेलेला एक मोबाईल कानडे यांचा होता तर दुसरा मोबाईल रुग्णालयातील परिचारिका सोनाली तुम्मा यांचा होता असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी जेलरोड पोलिस ठाण्याचे पोलीस नाईक शिंदे तपास करीत आहेत.