येस न्युज मराठी नेटवर्क : नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 7 मधील नागरिकांसाठी डॉ.गंगाधर कोरके यांच्या माईंड हॉस्पिटल येथे लसीकरण केंद्राचे उद्घाटन महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरसेवक तथा विरोधी पक्षनेता अमोल बापू शिंदे,मनपा उपायुक्त धनराज पांडे,डॉ.गंगाधर कोरके, डॉ.स्वाती कोरके आयोजक नगरसेवक देवेंद्र कोठे,तुकाराम मस्के,विजय पुकाळे,बाळासाहेब गायकवाड देगाव यु.पी.एच.सी डॉ. सोनाली महिंद्रकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
रजिस्ट्रेशन झालेल्या शहरातील नागरिकांना ऑन रिक्वेस्ट घरापासून मोफत पिकप अँड ड्रॉप सुविधा नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्याकडून उपलब्ध करण्यात आलेली आहे.शिबीर स्थळी संपूर्ण मंडप खुर्ची व्यवस्था तसेच नागरिकांना दररोज मिनरल वॉटर,चहा इत्यादी सुविधा विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात येत आहे.याचा खर्च महापालिके द्वारे घेतले जाणार नाही, प्रतिष्ठानच्या या पुढाकार बाबत उपायुक्त धनराज पांडे यांनी कौतुक केले. कोरोणामुक्त शहर करण्यासाठी लसीकरण होणे गरजेचे असून त्यासाठी लोकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन मान्यवरांनी केले.
लसीकरण केंद्र साठी हॉस्पिटल मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल हॉस्पिटलचे डॉक्टर गंगाधर कोरके डॉक्टर स्वाती कोरके यांचे विरोधी पक्षनेता अमोल शिंदे यांनी आभार मानले
याप्रसंगी नारायण तात्या भोसले,योगेश संत पवार,सज्जन वडणे,सोमनाथ सोनकांबळे,नारायण महाले,अनिल शिंदे,धैर्यशील जाधव,बालाजी प्रक्षाळे,दशरथ मोरे, अमर गावडे,दत्तात्रय पाटील,विक्रांत पाटील अजित मुत्तुर प्रभाग सातचे अधिकारी अमोल होमकर,सुनील राठोड,मुकेश बद्दूरकर उपस्थित होते.
शिबिर यशस्वी करण्यासाठी बाबा शेख,दिनेश जाधव,विनोद पवार,पवन खांडेकर,सचिन काशीद,सिद्धेश्वर कमटम,क्रांती गोयल, ऋषिकेश हारके,सचिन गोयल यांनी परिश्रम घेतले. देगाव यू.पी.एच.सी सेंटरच्या सर्व परिचारिका व स्टाफने लसीकरण करण्यासाठी सहकार्य केले.