- परस्परविरोधी तक्रारी
येस न्युज मराठी नेटवर्क : उत्तर कसब्यातील पंजाब तालमी जवळील गंगा विहिरीनजिक सार्वजनिक नळाचे पाणी वापरण्याच्या कारणावरून सैपन हुसेन बदामी आणि हाजरा युनूस शेख यांनी परस्पर विरोधी तक्रारी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात केल्या आहेत. सैपन बदामी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, युनूस शेख, कन्नो युनूस शेख, सरफराज युनुस शेख, गौस युनुस शेख आदी सात जणांनी नळावर पाणी भरण्याच्या कारणावरून घरासमोर येऊन शिवीगाळ केली आणि मारहाण केली. तसेच खिशातील मोबाईल रस्त्यावर टाकून त्याची तोडमोड केली व मोबाईल कव्हरमधील वीस हजार रुपये काढून घेतले. दुसऱ्या फिर्यादीत हाजरा युनूस शेख यांनी म्हटले आहे की , जुबेदा बदामी, अखलाख बदामी, शाहीन बदामी आदी पाच जणांनी घरात घुसून मुलास मारहाण केली. तसेच तलवार व चाकूसारखे शस्त्र घेऊन अंगावर धावून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फौजदार चावडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बरडे आणि पोलीस हवालदार काझी याप्रकरणी तपास करीत आहेत.