सोलापूर : प्रभाग क्रमांक सातला दोन्ही बाजूने मोठे नाले असून वसंत विहार नाला तसेच प्रतीक व उमा नगरी वाहणारा मुख्य नाला असून हे नाले पावसाळापूर्व साफ होणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने नालेसफाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आज या कामाची पाहणी करण्यात करताना नगरसेवक देवेंद्र कोठे, झोन क्र.१ विभागीय अधिकारी तपन डंके, प्रभागाचे अधिकारी अमोल होमकर, योगेश पवार, बाबा शेख,राहुल गोयल व सो.मा.पा कर्मचारी आदी उपस्थित होते. या सफाई मुळे अवंती नगर, प्रतिक नगर, थोबडे नगर, अभिषेक नगर, उमा नगरी, मनोहर नगर,जुनी पोलीस लाईन, राघवेंद्र नगर ,हजरत खान चाळ,हवळे चाळ, लोभा मास्तर चाळ,आधी भागांचा पावसामुळे ड्रेनेज चोकअप समस्या दूर होणार आहे.
जुनी पोलीस लाईन येथील निराळे वस्ती पूल सार्वजनिक शौचालय ते हिरज नाका ते लक्ष्मी लॉन्ड्री येथील नाल्यापर्यंत पावसाळी स्ट्रोमलाइन नव्याने प्रस्तावित करण्यात येत आहे.या कामामुळे येथील नागरिकांच्या घरात व दुकानात पावसाचे जाणारे पाणी बंद होणार आहे.