येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर जिल्ह्याचा covid-19 चा शुक्रवार दिनांक २१ मे रोजीचा अहवाल प्राप्त झाला असून नव्याने १५४१ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. गुरुवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात २६१९ व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. या कालावधीत २५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. मृतांमध्ये मोहोळ तालुक्यातील कोरवली येथील २८ वर्षांचा तरुण समाविष्ट आहे. तालुकानिहाय नवीन कोरोना रुग्णांचा आढावा घेतला असता बार्शी तालुक्यात २०६, करमाळा तालुक्यात १५८, माढा तालुक्यात २५८, माळशिरस तालुक्यात २७६, मोहोळ तालुक्यात १३२, पंढरपूर तालुक्यात ३६३ नवीन व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे.