येस न्युज मराठी नेटवर्क ; सोलापूर शहराचा शुक्रवार २१ मे रोजी चा covid-19 चा अहवाल प्राप्त झाला आहे. शहरामध्ये नव्याने ४४ जणांना कोरोनाची बाधा झाली असून गुरुवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ८६ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. प्रभागनिहाय नवीन कोरोनाबाधित रुग्णांचा आढावा घेतला असता प्रभाग क्रमांक २३ मध्ये ७, प्रभाग क्रमांक २४ मध्ये ७ आणि प्रभाग क्रमांक ७ आणि २६ मध्ये प्रत्येकी ५ नवीन कोरोना बाधित आढळले आहेत. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने कमी होत असल्यामुळे आता सोलापूरकर संचारबंदी व जमावबंदीचा आदेश रद्द होण्याबाबत वाट बघत आहेत. तसेच बाजारपेठेतील इतर दुकाने सुरू कधी होणार ? याबाबत प्रतीक्षा करीत आहेत.