येस न्युज मराठी नेटवर्क : कोरोना प्रतिबंधात्मक कारवाई मध्ये पोलीस आयुक्तालयाने २० मे रोजी २६७८ वाहनांची तपासणी केली. मास्क न वापरणे, मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन आणि आस्थापनांविरुद्ध नियमांचे उल्लंघन केल्याने कारवाई अशाप्रकारे पोलिसांनी ३,६३,९०० रुपये दंड वसूल केला आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी मास्क न लावलेल्या ४६० व्यक्तींविरुद्ध कारवाई करत २,३०,००० रुपये दंड वसूल केला. नियमांचे उल्लंघन केल्याने ७ आस्थापनांविरुद्ध कारवाई करून २८,००० रुपये दंड वसूल करण्यात आला. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याने ४७८ व्यक्तींना १,०५,९०० रुपये दंड करण्यात आला. नाकाबंदी दरम्यान ५१ वाहने जप्त करण्यात आली.