सोलापूर (प्रतिनिधी) एका अल्पवयीन मुलीला अश्लील भाषेत बोलून तिला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटणा दि.१९ मे रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सोलापुरात घडली.याप्रकरणी त्या अल्पवयीन मुलीच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून शाहरुख अब्दुलगणी शेख (रा.सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,संशयित आरोपी शाहरुख शेख हा पहाटे आपल्या घरासमोर येऊन पीडित मुलगी हिला तू माझ्याबरोबर बाहेर चल तुझ्याशी बोलायचे आहे,तू जर माझ्यासोबत नाही आलीस तर आपल्या मधील संबंधाबाबत तुझ्या आईला मी सर्व सांगेल असे म्हणून दम दिला.त्यावेळी पीडित मुलीने असे काही करू नकोस म्हणून शाहरुख शेख याला समजावून सांगत असताना त्या मुलीचा हात पकडून ‘तू मुझे बहुत पसंद है, मै तुझसे शादी करना चाहता हु’ असे म्हणून तिला लाज वाटेल असे अश्लील भाषेत बोलू लागला.त्यावेळी त्या मुलीने त्याच्या तावडीतून कशीतरी सुटका करून निघून गेली.मात्र शाहरुख शेख याने त्या पीडित मुलीचा पाठलाग करून तिची छेड काढली.असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पेटकर हे करीत आहेत.