सोलापूर : आर्ट ऑफ लिव्हिंगच्या इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्यूमन व्हॅल्यूज या संस्थेच्या माध्यमातून आणि बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान यांच्या बिईंग ह्युमन या संस्थेच्या सहकार्याने सोलापूर जिल्ह्यासाठी २५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले आहेत . यापैकी पाच मशीन करमाळा व मोहोळ येथे देण्यात आले आहेत. या संस्थेने आत्तापर्यंत राज्य सरकारला ७५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन्स आणि वीस लाख एन ९५ मास्क दिले आहेत. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे संस्थेच्या वतीने ही मदत सुपूर्द करण्यात आली. उपजिल्हाधिकारी वाघमारे आर्ट ऑफ लिव्हिंगचे मार्गदर्शक श्रीनिवास सादूल, समन्वयक लक्ष्मण भंडारी आणि प्रशिक्षक राजू झुंजार यावेळी उपस्थित होते.