मुंबई : देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतींची शंभरीकडे वाटचाल सुरु झाल्याचं दिसून येतंय. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 26 पैशांनी वाढून ती 98.12 रुपयांवर पोहोचली आहे तर डिझेलची किंमत 31 पैशांनी वाढून ती 90 रुपयांवर पोहोचली आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किंमतीत 27 पैशांची वाढ झाली असून ते 92 रुपयांवर पोहोचलं आहे तर डिझेलच्या किंमतीत 30 पैशांनी वाढ होऊन ते 82.36 रुपयांवर पोहोचलं आहे. पुण्यामध्ये पेट्रोलची आजची किंमत 98 रुपये तर डिझेलची किंमत 87.92 रुपये इतकी आहे.
या दोन महिन्याच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या असूनही देशातल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली नव्हती. यामागे पाच राज्यातील निवडणुका हे कारण असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र जशा या निवडणुका संपल्या तसं लगेचच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होण्यास सुरुवात झाली. निवडणुका झाल्यानंतर आता होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे आता सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार हे नक्की.
पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.