येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहराचा 10 मे रोजी चा covid-19 चा अहवाल प्राप्त झाला असून शहरातील १७२ व्यक्तींना कोरोनाची नव्याने बाधा झाली आहे. रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासांत शहरातील नऊ व्यक्तींचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. शहरातील प्रभाग निहाय बाधित रुग्णांची संख्या पाहिली तर प्रभाग क्रमांक २४ मध्ये सर्वाधिक ३७ आणि प्रभाग क्रमांक १५ मध्ये १५ व प्रभाग क्रमांक २३ मध्ये बारा तसेच प्रभाग क्रमांक २१ मध्ये दहा नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. २४ तासात रुग्णालयातून घरी परत गेलेल्या बाधितांची संख्या २६३ आहे.