बीजिंग : चीनचे एक मोठं अनियंत्रित रॉकेट The Long March 5B आता हिंदी महासागरात कोसळलं असल्याचं वृत्त चीनच्या स्टेट मीडियाने दिले आहे. त्यामुळे हे रॉकेट आता कुठे कोसळणार याच्या अफवांना आळा बसला आहे तसेच जगाची चिंताही मिटली आहे. हिंदी महासागरात कोसळण्याच्या आधी या रॉकेटचे बहुतांश भाग हे जळून नष्ट झाले होते.
चीनच्या स्टेट मीडियाने सांगितलं आहे की, The Long March 5B च्या अवशेषांनी बीजिंगच्या प्रमाणवेळेनुसार, 10 वाजून 24 मिनिटांनी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला होता. नंतर या रॉकेटचे अवशेष 72.47 डिग्री पूर्व अशांश आणि 2.65 डिग्री उत्तर रेखांश या ठिकाणी पडले. हे ठिकाण मालदीवच्या पश्चिमेला काही अंतरावर आहे.