सोलापुरात नवीन १६८ व्यक्तींना कोरोना, १८ जणांचा मृत्यू
येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर महापालिकेचा ४ मे रोजीचा कोरोनाचा अहवाल प्राप्त झाला असून शहरात नव्याने १६८ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे . २४तासात १८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे . मृतांमध्ये नई जिंदगी येथील भाग्यलक्ष्मी नगरमध्ये राहणाऱ्या ४० वर्षांच्या व्यक्तीचा तसेच जुळे सोलापूर येथील बिलाल नगर मध्ये राहणाऱ्या ३५ वर्षाच्या पुरूषाचा समावेश आहे.याच २४ तासांमध्ये रुग्णालयातून ४०१ व्यक्ती कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. शहरातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या घटत असताना रुग्णालयातून घरी परतणाऱ्यांची संख्या चारशेच्या वर झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे . तरीदेखील अद्याप काही प्रभागांमध्ये नव्याने कोरोना बाधित रुग्ण सापडण्याची संख्या अधिक आहे . प्रभाग क्रमांक २४ मध्ये ३५ , प्रभाग २६ मध्ये २३ , प्रभाग २३ मध्ये २० , प्रभाग २१ मध्ये ११ आणि ५ मध्ये १० अशा पाच प्रभागांमध्ये दहापेक्षा अधिक नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.