येस न्युज मराठी नेटवर्क ; सोलापूर जिल्ह्यात गाव तिथे कोवीड केअर सेंटर, या भूमिकेतून पहिल्या टप्प्यात शंभर गावांमध्ये दोन दिवसात कोविड केंद्र उभारणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले. आहे. पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यातील १०० ग्रामपंचायत स्तरावर ही सेंटर सुरू करण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे . योग्य अशी सार्वजनिक ठिकाणे निश्चित करून २५ ते ५० क्षमतेच्या खाटांची क्षमता असलेले सेंटर दोन दिवसात सुरु करण्याबाबत सर्व गटविकास अधिकाऱ्यांना स्वामी यांनी आदेश दिला आहे . अक्कलकोट तालुक्यात ६, बार्शी व करमाळ्यात प्रत्येकी ५, कुर्डूवाडी मध्ये ९, मोहोळमध्ये ८, मंगळवेढ्यात ३, माळशिरस मध्ये १९, पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक २१ , सांगोल्यात १०, दक्षिण सोलापूर मध्ये ९ आणि उत्तर सोलापूर मध्ये ५ अशी शंभर ठिकाणी कोवीड सेंटर सुरू होत आहेत .या सेंटर साठी खासगी तसेच शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा घेण्यात येणार आहे. या कोवीड केंद्रांमध्ये औषधाची व्यवस्था तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत करण्यात येईल असेही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.