येस न्युज मराठी नेटवर्क : सिद्धेश्वर मार्केट यार्ड येथील दोन नंबर गेट जवळील प्रीतम सेल्स कार्पोरेशन दुकानाजवळ २२ एप्रिल रोजी मोटारीची काच फोडून अज्ञात चोरट्याने चालकाचा मोबाईल आणि 3 लाख ४४ हजार रुपये रोख पळवण्याची फिर्याद जेलरोड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. रोहन शशिकांत राऊत यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे . सिद्धेश्वर मार्केट यार्ड सोलापूर येथून सांगली कडे जाण्यासाठी राऊत यांनी गाडीच्या चालकाकडे पैसे दिले होते . राऊत हे सांगली येथून घाऊक किराणा मालाची खरेदी करीत असतात याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निगडे अधिक तपास करीत आहेत.