येस न्युज मराठी नेटवर्क : प्रिसिजन कॅमशाफ्ट चे सर्वेसर्वा यतीन शहा आणि बालाजी अमाईन्स चे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांनी सोलापूरचे नाव सातासमुद्रापलीकडे कधीच पोहोचवले आहे त्यांच्या दातृत्वा बद्दल नेहमीच सकारात्मक चर्चा होते सोलापुरातील प्रत्येक चांगल्या बाबीसाठी धावून येणाऱ्या प्रिसिजन उद्योग समूहाने आता सोलापूर शहरातील मोदी स्मशानभूमीतील बंद पडलेली विद्युत दाहिनीत सुरू करण्याबाबत सर्व खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांसाठी जीवनदायी समजल्या जाणाऱ्या रेमीडेसिवी इंजेक्शन निर्मितीसाठी कच्चामाल पुरवणार्या बालाजी अमाईन्स ने रुपा भवानी स्मशानभूमीत नवीन विद्युतदाहिनी बसवण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभर विविध कार्यक्रम समाजसेवी उपक्रम घेऊन यतीन शहा आणि राम रेड्डी आपले दातृत्व नेहमीच सिद्ध करून दाखवले आहे अशा या सोलापूरच्या दोन्हीही सुपुत्रांना येस न्यूज मराठीचा मानाचा सलाम.