येस न्युज मराठी नेटवर्क : साखर उत्पादन …. वीज निर्मिती… इथेनॉल निर्मिती… मद्यनिर्मिती नंतर गेल्या वर्षीपासून सॅनिटायझर निर्मिती करून महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देणाऱ्या साखर कारखान्यांनी आता ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ऑक्सिजनचे प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला आहे हा दिलासा देणारा निर्णय आहे त्यामुळे निश्चित कारखानदारांना आणि महाराष्ट्रातील जनतेला यामुळे दिलासा मिळेल . सोलापुरात देशात सर्वाधिक साखर कारखाने आहेत त्यामुळे लवकरच सोलापूर देशाला ऑक्सिजन पुरवठा करेल अशी आशा आहे.