येस न्युज मराठी नेटवर्क : महाराष्ट्रात दररोज सुमारे 60 ते 65 हजार नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे. यामुळे रुग्णालये हाउसफुल्ल झाली आहेत अनेक ठिकाणी व्हेंटिलेटर चे बेड उपलब्ध नाहीत. रेमडेसीवर सारख्या अनेक इंजेक्शनचा तुटवडा काळाबाजार सुरूच आहे .प्रत्येक रुग्णालयातील ऑक्सिजन काही तासात संपत आहे त्यामुळे अनेकांची हॉस्पिटलची ऑक्सिजन मिळवण्यासाठी तडफड सुरू आहे.
प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी ऑक्सिजनचे टॅंकर मिळवण्यासाठी दिवस रात्र धडपडत आहेत. प्राणवायू समजल्या जाणाऱ्या ऑक्सिजनचा तुटवडा अख्ख्या राज्यात आहे सध्या सुमारे 75 हजार रुग्णांना पंधराशे ते सोळाशे मेट्रिक टन ऑक्सिजन लागत आहे महाराष्ट्रात 1250 मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन होते तर 450 मेट्रिक टन ऑक्सिजनचा तुटवडा आहे. तीनशे मेट्रिक टन परराज्यातून ऑक्सिजन पुरवठा सध्या होत आहे एप्रिलअखेर महाराष्ट्राची ऑक्सिजन गरज दोन हजार मेट्रिक टनावर पोहोचणार आहे त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यामध्ये विजेची कमतरता भासते मात्र यावर्षी महाराष्ट्र ऑक्सिजनवर आहे. नेहमी रॉकेलच्या पेट्रोल-डिझेलच्या काळाबाजारावर वॉच ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना आता ऑक्सिजनचा टँकर आपल्या जिल्ह्यात विना कट कट कसा पोहोचेल यासाठी पोलिस बंदोबस्त लावावा लागत आहे .प्राण वायू चा तुटवड्यामुळे महाराष्ट्र भीतीच्या छत्रछायेखाली वावरत आहे.