येस न्युज मराठी नेटवर्क ; सोलापूर शहरात पोलीस आयुक्तालयाने कोरोना प्रतिबंधात्मक कारवाई अधिक कडक केली आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आणि उपायुक्त बापू बांगर तसेच पोलिस उपायुक्त (मुख्यालय) दिपाली घाटे आणि पोलीस उपायुक्त (परिमंडळ) डॉक्टर वैशाली कडूकर यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईत मास्क न वापरणाऱ्या २९० नागरिकांविरुद्ध कारवाई करून १ लाख ४५,००० रुपये दंड वसूल करण्यात आला . त्याच प्रमाणे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या २९१ वाहन चालकांविरुद्ध कारवाई करून ६४ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला.