येस न्युज मराठी नेटवर्क : आशा नगर हनुमान मंदिराजवळील मनोज भोजू राठोड या रिक्षाचालकाची 19 एप्रिल रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास सुनील नगर रोडवर एका अनोळखी रिक्षाचालकाबरोबर मारामारी झाल्याची फिर्याद एमआयडीसी पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. मनोज राठोड हे त्यांची रिक्षा घेऊन जात असताना समोरून येणाऱ्या रिक्षाचालकाने कट मारला. फिर्यादी मनोज राठोड व या अनोळखी रिक्षाचालकांची बाचाबाची झाली . त्यानंतर संबंधित रिक्षाचालकाने मनोज राठोड यांना सिमेंट दुकानाजवळ पडलेल्या लाकडाने डोक्यात मारहाण केली. त्याचप्रमाणे लाथाबुक्क्या मारल्या. याप्रकरणी पोलीस हवालदार भोई तपास करीत आहेत.