येस न्युज मराठी नेटवर्क : महाराष्ट्रासाठी पुढील तीन-चार दिवसांत ११२१ व्हेंटिलेटर्स दाखल होतील अशी माहिती केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात दिली.जावडेकर म्हणाले, यातील ७०० गुजरातमधून व ४०० आंध्र प्रदेशमधून येत आहेत. ऑक्सिजन देखील औद्योगिक उत्पादन जिथ होत तिथून, ऑक्सिजन मिळण्यासाठी देखील केंद्र सरकार महाराष्ट्राला सहकार्य करणार आहे.
सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जे मनुष्यबळ टेस्टिंग, ट्रॅकींग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंटसाठी लागणार आहे. ते मनुष्यबळ घेण्यासाठी नॅशनल हेल्थ मिशनमधून केंद्र सरकार पैसे देणार आहे. कारण, आम्ही असे मानतो हे राष्ट्रीय संकट आहे. सगळी राज्य सगळी जनता आमचीच आहे. त्यामुळे जिथे परिस्थिती गंभीर आहे तिथे जास्त लक्ष आणि उपाय अशा स्वरूपाचे धोरण आहे. आता केंद्राच्या ३० टीम या महाराष्ट्रात आलेल्या आहेत. या ३० टीम विविध जिल्ह्यांमधील परिस्थितीचा आढावा घेऊन आणखी काय करायला हवे ? यासंबंधीचा अभिप्राय तयार केलेला आहे. महाराष्ट्राला १ कोटी १० लाख एवढे डोस महाराष्ट्राला मिळाले आहेत. १ कोटींपेक्षा अधिक केवळ तीन राज्यांनाच डोस मिळाले आहेत. राजस्थान, गुजरात व महाराष्ट्र. त्यापैकी ९५ लाख कालपर्यंतचे आहेत, कारण आज थोड आणखी वाढले आहेत. १५ लाख ६३ हजार वॅक्सीन शिल्लक आहेत,असे देखील यावेळी जावडेकर यांनी बोलून दाखवले.