सोलापूर : गेल्या पाच दिवसापासून जमावबंदीचा आदेश असताना आणि बहुतांश दुकाने बंद असताना मोकाट फिरणाऱ्या सोलापूरकरांवर शनिवार पासून कडक कारवाई करण्यासाठी पोलिस सज्ज झाले आहेत. सकाळी सात वाजेपर्यंत सोलापूरच्या रस्त्यावर तुरळक गर्दी दिसत होती काही ठिकाणी पावसाच्या रिमझिम सरी देखील बरसल्या. मात्र आठ वाजताच चौकाचौकात पोलीस आपल्या फौजफाट्यासह सज्ज झाले. सोलापूर शहरात 21 ठिकाणी नाकाबंदी आहे चौकाचौकात पोलीस आहेत अत्यावश्यक सेवा सुरू आहे मात्र कोणत्याही नागरिकांनी स्वतः पार्सल घेऊन जाण्याऐवजी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानदाराने घरपोच सेवा देणे अपेक्षित आहे. त्यामुळे पोलिसांकडून दुचाकी वरून डबलसीट फिरणाऱ्या विरुद्ध कारवाईची मोठी मोहीम सुरू केली आहे. तुमची वाहने जप्त होऊ शकतात दंडात्मक कारवाई देखील होऊ शकते त्यामुळे मेडिकल इमर्जन्सी शिवाय आपण बाहेर पडू नका असे आवाहन पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांनी केले आहे.