येस न्युज मराठी नेटवर्क ; कोरोना संसर्गाने राज्यात गतवर्षी थैमान घातले होते . तेव्हा बार्शी तालुक्यात सर्वात जास्त कोरोना रुग्ण आढळले होते आणि मृत्युमुखी ही पडले होते .आता सलग दुसऱ्या वर्षी बार्शी तालुका पुन्हा कोरोना रुग्णांचा हॉटस्पॉट बनला असून रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार बार्शी शहरात व तालुक्यात 206 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. बार्शी तालुक्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात एकूण 12 हजार 386 रुग्ण आढळून आले आहेत. बार्शी तालुक्यातील व्यक्ती सध्या कोरोना वर उपचार घेत आहेत. बार्शी शहरात भूम, परांडा, कळंब, येरमाळा, वाशी , माढा, उस्मानाबाद येथून कोरोना रुग्ण उपचारासाठी येत असून रुग्णांवर उपचार करणे अवघड होत आहे . पाच को बीड केअर सेंटर अनेक रुग्णालय खाजगी हॉस्पिटल येथे ऑक्सिजनसह बेडची व्यवस्था केली असली तरी ती सध्या अपुरी पडत आहे .बार्शी तालुक्यातील रुग्णांची संख्या आणखी वाढल्यास आरोग्य विभागा समोर मोठा प्रश्न उभा राहणार असल्याचे प्रांत अधिकारी हेमंत निकम यांनी सांगितले आहे.