येस न्युज मराठी नेटवर्क : कुचननगर येथील वैष्णवी गोपाळ मिठा या 32 वर्षाच्या महिलेने तामीळनाडू येथील व्यापारी सुंदर राजन यांनी ४ लाख ९० हजार 92 रुपयांचा माल घेऊन एकही पैसा न दिल्याबाबत फिर्याद दाखल केली आहे . 3 फेब्रुवारी 2017 पासून 17 जून 2017 पर्यंत मिठठा यांनी व्ही आर एल लॉजिस्टिक्स यांच्यामार्फत वेळोवेळी टॉवेल्स पाठविले आहेत. सुरुवातीला तीस हजार रुपये ऍडव्हान्स रक्कम देणाऱ्या सुंदर राजन यांनी माल पोहोचल्यानंतर मात्र गेल्या चार वर्षात एक पैसाही मीठा यांना दिलेला नाही त्याचप्रमाणे परत फोन केल्यास पाहून घेईन अशी धमकीही दिली आहे.