येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहर व जिल्ह्यात बुधवारी रात्री बारा वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार 24 तासात 819 नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये 539 तर सोलापूर शहरात 280 व्यक्तींना नव्याने कोरोनाची बाधा झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ५३९ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली असून त्यामध्ये माळशिरस तालुक्यातील ग्रामीण भागात 96 ,बार्शी 32, करमाळा 52, माढा 55, मंगळवेढा 34, मोहोळ 23 , उत्तर सोलापूर 15 ,पंढरपूर 71 आणि सांगोला मध्ये १५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यामधील करमाळा तालुक्यातील कोर्टी येथील 75 वर्षाची व्यक्ती, बार्शी तालुक्यातील खामगाव येथील 60 वर्षांची व्यक्ती, बार्शी तालुक्यातील बस स्टँड चौकातील 84 वर्षाची व्यक्ती, दक्षिण सोलापूर तालुक्यातील वरळेगाव येथील 76 वर्षांची व्यक्ती आणि माळशिरस तालुक्यातील माळीनगर येथील ७० वर्षांची व्यक्ती कोरोनामुळे मृत्युमुखी पडली आहे . सोलापूर शहरात कोरोनामुळे चार पुरुष व दोन महिला अशा सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर शहरातील 188 ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण गेल्या चोवीस तासात सापडले आहेत. सोलापूर महापालिका आणि जिल्हा प्रशासनाची चिंता कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्यामुळे अधिकच वाढली आहे.