सोलापूर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने डिसेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र सेट परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. या परीक्षेत इंग्रजी विषयातून ए.जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक नागराज खराडे हे उत्तीर्ण झाले आहेत. संगमेश्वर महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांनी अध्यापनाचे काम केले. सध्या ते सोलापुरातील ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. त्यांना प्रा डॉ. टी. एन. कोळेकर, प्रा. अर्जुन धोत्रे, डॉ ॲनी जॉन, डॉ अशोक कदम, डॉ महमदमुस्तफा मकानदार, धानय्या कवटगी आदींचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशानिमित्त प्राचार्य डॉ. एम. ए .चौगुले, प्राचार्य डॉ. एस. ए. पाटील, प्रा आर. व्ही. कुलकर्णी, संगमेश्वर महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. नंदा साठे, उपप्राचार्य प्रा. धानप्पा मेत्री यांनी अभिनंदन केले.