मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला बॉलिवूड अभिनेता आमिर खानला कोरोनाची लागण झाली आहे. नुकतंच त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर येत आहेत. आमिर खान सध्या होम क्वारंटाईन असल्याची माहिती मिळत आहे.
आमिर खानच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमिर खान याला कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर आमिर खान सेल्फ क्वारंटाईन झाला आहे. आमिर खानची प्रकृती सध्या बरी आहे. आमिर खानच्या संपर्कात आलेल्यांनी सर्वांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत: ची कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन आमिर खानने केले आहे.