येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर जनता सहकारी बँकेची सुमारे १५० कोटीची कर्जे एनपीएमध्ये असून ही सर्व खाती फ्रॉड खाती आहेत. याला विद्यमान चेअरमन किशोर देशपांडे आणि संचालक जबाबदार असल्याचा आरोप सोलापूर जनता बँक बचाव परिवार पॅनलचे भरत तांबोळी, दामोदर दरगड, रोहिणी तडवळकर, नरेश साखरे आदींनी पत्रकार परिषदेत केला आहे. जनता बँकेची निवडणूक रविवारी दि. १४ मार्च रोजी होत असून सत्ताधाऱ्यांमुळे बँकेचा तोटा वाढला आहे. अनेक कर्ज प्रकरणामध्ये अनियमितता आहे. एवढी मोठी बँक वाचवण्यासाठीच आम्ही निवडणुकीत पॅनल उभे केल्याचे त्यांनी सांगितले.
सोलापूर जनता बँक बचाव पॅनेलने याबद्दल बोट ठेवत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वाईकर यांच्या पत्राचा आधार दिला आहे जनता बँकेत दोन हजार सत्तावीस कोटींचा ठेवी आहे तर बार्शी पाच कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे चारशे कर्मचारी आणि एकूण 41 शाखा असलेल्या बँकेचे तीन लाख 73 हजार 596 खातेदार आहेत एकूण थकित कर्जाच्या 75 टक्के म्हणजे जवळपास दीडशे कोटी रुपये वसूल न होणारी रक्कम आहे तसेच यातील बहुतांश खाती फ्रॉड खाती आहेत असे पत्र बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे बऱ्याच वर्षापासून सभासदांना लाभांश वाटप होत नाही बँकेचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे या सर्व प्रकाराला विद्यमान चेअरमन आणि संचालक जबाबदार आहेत निवडणुकीमध्ये आमच्या पाण्याचा विजय झाला तर एक वर्षभरात आम्ही ही बँक सुस्थितीमध्ये आणू तसेच ज्यांनी आजवर चुकीच्या पद्धतीने काम केलं आहे त्यांच्या विरोधात कारवाई करू असा इशारा देखील या पॅनलमधील उमेदवारांनी यावेळी दिला.
संघ परिवारातील ही बँक असल्यामुळे आपापसातील वाद मिळतील अशी आशा होती मात्र किशोर देशपांडे यांनी मनमानी पद्धतीने काम केलं आम्हाला विश्वासात घेतलं नाही संघाच्या देखील काही लोकांनी आम्हाला पॅनल उभा करण्याचा सल्ला दिला त्यामुळे आम्ही हा पॅनल उभा करीत असल्याचे राम तळवळकर मोहिनी पत्की आदींनी यावेळी सांगितले..
