येस न्युज मराठी नेटवर्क । देवेंद्र फडणवीस यांनी अन्वय नाईक प्रकरण दाबले असून याची आमाही चौकशी करतोय, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत घोषित केले. सचिन वाझे यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णव गोस्वामी यांना घरातून उचललं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस सचिन वाझे यांच्या मागे लागले, असल्याचा आरोप . शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केला. सचिन वाझे याप्रकरणाचा तपास करत होते. ते पदावर कायम राहिले तर माजी मुख्यमंत्र्यांसह अनेकजण अडचणीत येतील. त्यामुळे भाजपकडून सचिन वाझे यांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केला.