सोलापूर : सोलापूर महानगरपालिका येथे आज होणाऱ्या स्थायी समिती सभापती व परिवहन सभापती निवडीचे पीठासन अधिकारी म्हणून भूजल सर्वेक्षण संचालक,पुणे डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी (भा.प्र.से)हे आज महापालिका आयुक्त यांच्या कार्यालयात आले असता यावेळी आयुक्त मा. पि. शिवशंकर यांनी महापालिकेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.