सोलापूर :(विशेष प्रतिनिधी )भंडारकवठे गावच्या सर्वागीण विकासासाठी कटीबध्द असल्याचे प्रतिपादन नूतन सरपंच चिदानंद कोटगोंडे यांनी केले,भंडारकवठे ग्रामपंचायत कार्यालयात नूतन सरपंच उपसरपंच पदग्रहण सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नूतन सरपंच चिदानंद कोटगोंडे बोलत होते. यावेळी बाजार समितीचे संचालक वसंत पाटील.पंचायत समितीचे माजी सदस्य विठ्ठल पाटील.माजी सरपंच अण्णाराव कारभारी.सोमशंकर पाटील.ग्रामविकास अधिकारी संजय राठोड आदीची प्रमुख उपस्थिती होती.
या पदग्रहण सोहळ्यात नूतन सरपंच चिदानंद कोटगोंडे.उपसरपंच सरिता तुरबे.नूतन सदस्यांचा शाल पुष्पगुच्छा देऊन सत्कार करण्यात आला,
भंडारकवठे ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा वर्चस्व सिध्द करण्यासाठी संपूर्ण गावातील नागरिकांनी श्री समर्थ ग्रामविकास पँनलच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सत्ता प्रस्थापित करण्यासाठी पुन्हा संधी दिल्याबद्दल पँनल प्रमुख विठ्ठल पाटील यांनी संपूर्ण ग्रामस्थांचे जाहीर आभार मानले .यावेळी युवानेते प्रथमेश पाटील.नितीन वारे.अमसिध्द कमळे.नंदकुमार वारे.आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक अनिल घंटे यांनी केले तर शेवटी आभार शिवानंद हत्ताळे यांनी मानले.
या पदग्रहण सोहळ्यासाठी माजी सरपंच धोंडप्पा कमळे.धरेप्पा कमळे,सिध्देश्वर कुगणे. सोमनिंग बिराजदार. महासिध्द कुंभार.बुराण मुजावर.शरद पाटील,हणमत पुजारी, श्रीमंत कुंभार.हणमत विजापूरे.रवी तुरबे.अशोक कदम. प्रकाश मुक्काणे.यांच्यासह बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.