येस न्युज मराठी नेटवर्क : करोना लसीकरणाचा दुसरा टप्पा ६० वर्षांवरील सामान्यांसाठी सोमवारी 1 मार्च रोजी सुरू झालेला असला तरी प्रत्यक्षामध्ये कोरोना साठी चे co-win पोर्टल तसेच co-win ॲप सर्वर डाऊन होत असल्याने सोलापुरात ओपन होण्यात अडचणी येत आहेत . सोमवारी महापालिकेच्या दाराच्या दवाखान्यात दुपारी साडेचारच्या सुमारास काही काळ हे पोर्टल सुरु झाले होते मात्र ते मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून जवळपास एक वाजेपर्यंत सुरूच झाले नाही. त्यामुळे सोमवारी तसेच मंगळवारी दाराशा दवाखान्यात दुसऱ्या लसीकरणासाठी आलेल्या तसेच ज्येष्ठ नागरिकांना वाट पाहून घरी परतावे लागले. पोर्टलवर मंजुरी मिळाल्याशिवाय कोणालाही लस देऊ नयेत असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले आहेत.