सोलापूर : कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सोमवारी संपूर्ण देशात सुरू झाला असून पंचेचाळीस वर्षांवरील आजारी व्यक्ती आणि साठ वर्षावरील व्यक्तींना ही लस देण्यात येणार आहे . त्यासाठी को विन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. सिद्धेश्वर पेठ येथील यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,अश्विनी रुग्णालय , व सोलापूर कॅन्सर सेंटर, मदर तेरेसा हॉस्पिटल, धनराज गिरजी हॉस्पिटल, चंदन निरो सायन्सेस हॉस्पिटल.. दमानी नगर, डॉक्टर रघोजी किडनी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मोहिते नगर, होटगी रोड या खासगी रुग्णालयात कोरोना चे लसीकरण होणार आहे त्याशिवाय सिव्हींल हॉस्पिटल येथेदेखील मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.