पंढरपूर – तालुक्यांतील सिध्देवाडी-चिचुंबे-तरटगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंचपदी सौ. रोहिणी सारंग जाधव तर उप सरपंच ज्ञानेश्वर यशवंत गडदे यांची बिनविरोध निवड झाली आहे.सिध्देवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच निवड आज सकाळी ११ वाजता घेणेत आली. एकुण ७ सदस्य उपस्थित होते.
गेल्या २५ वर्षात प्रथम सत्तांतर झाले आहे. या ग्रामपंचायतीवर परिचारक व आवताडे गटाची सत्ता आली आहे. दोन्ही ड्राॅ मध्ये सरपंचपद हे सर्वसाधारण महिला झालेने रोहिणी सारंग जाधव या नशीबवान ठरल्या आहेत. साहेबराव लक्ष्मण जाधव यांच्या त्या सुन आहेत. सर्व संमतीने सरपंच व उप सरपंच निवड बिनविरोध झाली आहे. या निवडी नंतर नुतन सरपंच व उप सरपंच यांनी पंढरपूर येथे परिचारक यांचे वाड्यावर जाऊन आमदार प्रशांत परिचारक यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले. यावेळी युवा नेते प्रणव परिचारक उपस्थित होते. तसेच कासेगाव येथे जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख व संग्राम देशमुख यांनी नुतन सरपंच व उप सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार केला.ग्रा प सदस्य सिध्देश्वर ब्रम्हदेव जाधव, सदस्य रमेश बनसोडे, सदस्या सौ. बेबीनंदा बाबुराव गोडसे, सौ. संगीता सुरेश जाधव, सौ. आशा बालाजी जाधव,
सर्व कार्यकर्त्यांनी मिळून गुलाल उधळून जल्लोष केला. मेजर बाबुराव गोडसे, मारूती घुले, बजरंग जाधव , आनंदा औदुंबर जाधव, पोलिस पाटील दत्तात्रय जाधव, रामचंद्र नाथा जाधव, बालाजी माणिक जाधव, कल्याण जगन्नाथ जाधव, ब्रम्हदेव जाधव, सिध्देश्वर जाधव, बालाजी सदाशिव जाधव, सुरेश गोडसे, बिनु गडदे, बिरू गडदे , संतोष जगन्नाथ जाधव, मेजर सिध्देश्वर जाधव,जितेंद्र जाधव , संतोष पाटील, तुकाराम वासुदकर, मेजर अतुल जाधव, दिलीप जाधव , दशरथ आबा जाधव, महादेव घुले, सुभाष कोळी , किरण उत्तम जाधव, प्रफुल्ल गोडसे, बबन विष्णु जाधव, सागर जाधव , विजय जाधव, धोंडिबा जाधव यांनी सरपंच निवड बिनविरोध होणेसाठी प्रयत्न केले.