सोलापूर : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या महामार्गाच्या कामांची चर्चा देशभर सुरू असताना सोलापुरात आज एक नवे रेकॉर्ड होत आहे. दररोज 40 किलोमीटर महामार्ग बांधण्याचे गडकरींचे टार्गेट असले तरी सोलापूर जिल्ह्यात एकाच ठिकाणी तब्बल सिंगल लेन 25 KM लांबीचा महामार्ग बांधला जाणार आहे. त्यामुळे या रेकॉर्डमुळे सोलापूरचे नाव वेगळ्या उंचीवर जाणार आहे. सोलापूर -विजापूर या महामार्गाचे काम गतीने सुरू असून आज म्हणजेच 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 11 च्या दरम्यान या महामार्गावर पाच ठिकाणी एकूण पंचवीस किलोमीटर लांबीचा महामार्ग बांधण्यात येणार आहे.
त्यामुळे या महामार्गावर पाच ठिकाणी सर्वत्र यंत्रणा आणि इंजिनियर तसेच कामगारांचा फौजफाटा दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यात नितीन गडकरी यांनी तब्बल 28 हजार कोटींचे महामार्ग मंजूर केले आहेत या सर्वच महामार्गांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत त्यामुळे सोलापूर लवकरच महामार्गांच्या माध्यमातून जोडले जात आहे सोलापूर विजापूर या महामार्गाचे काम गेल्या सात ते आठ वर्षांपासून रखडले होते मात्र गडकरी यांचे सातत्याचे प्रयत्न तसेच प्रकल्प संचालक संजय कदम यांचा पाठपुरावा आणि जिल्हाधिकारी तसेच सर्व लोकप्रतिनिधींचे लक्ष यामुळे या महामार्गाचे काम आता गतीने सुरू आहे. सोलापूर विजापूर हा 110 लांबीपैकी 80 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. सध्या सोलापूर जवळील बाळे ते हत्तुर या बायपास मार्गावर आज हत्तुर ते टाकळी ,टाकळी ते होरर्ती कर्नाटक राज्यातील होरर्ती ते सिरगुंडी आणि सिरगुंडी ते विजापूर या पाच ठिकाणी युद्धपातळीवर काम करून रेकॉर्ड केली जाणार आहे अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली.