येस न्युज मराठी नेटवर्क । LPG गॅस सिलिंडरचीही मोठी दरवाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ केली आहे. यानंतर सबसिडी नसणाऱ्या 14.2 किलोग्रॅमच्या एलपीजी गॅस सिलेंडरची दिल्लीतील किंमत 794 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे.
नवीन दर 25 फेब्रुवारीपासून अर्थात आजपासून लागू होत आहेत. फेब्रुवारी महिन्यात तीन वेळा एलपीजी गॅस सिलेंडरचे दर वाढले आहेत. त्यामुळे पुढील महिन्यात सामान्यांना आणखी फटका सहन करावा लागणार का याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. 1 डिसेंबरपासून आतापर्यंत एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 200 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे सामान्यांच्या बजेटवर नक्कीच परिणाम होत आहे. दर 594 रुपयांवरून आज 794 रुपये प्रति सिलेंडर झाले आहेत.
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरच्या किंमती बदलतात. फेब्रुवारी महिन्यात देखील कमर्शिअल गॅसच्या किंमतीत 190 रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर दिल्लीमध्ये या 19 किलोग्रॅमच्या सिलेंडरची किंमत 1533.00 रुपये प्रति सिलेंडर तर मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये दर 1482.50 रुपये, 1598.50 रुपये आणि 1649.00 रुपये आहेत.
असे वाढले दर
●1 डिसेंबर रोजी दर 594 रुपयांवरून 644 रुपये प्रति सिलेंडर झाले
●1 जानेवारी रोजी दर 644 रुपयांवरून 694 रुपये प्रति सिलेंडर झाले
●4 फेब्रुवारी रोजी दर 694 रुपयांवरून 719 रुपये प्रति सिलेंडर झाले
●15 फेब्रुवारी रोजी दर 719 रुपयांवरून 769 रुपये प्रति सिलेंडर झाले
●25 फेब्रुवारी रोजी दर 769 रुपयांवरून 794 रुपये प्रति सिलेंडर झाले