सोलापूर । सोलापुरातील छत्रपती संभाजी तलाव म्हणजेच कंबर तलाव येथे एक पुरुष जातीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.गुरुवारी २५ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली असून विविध शंका- कुशंका वर्तवल्या जात आहेत. सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या काही व्यक्तींनी तलावातील मृतदेह पाहिला याची माहिती पोलीस कंट्रोल रूमला दिली. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.