मुंबई : सलग 12 दिवसांच्या इंधन दरवाढी नंतर दोन दिवस पेट्रोल, डिझेलचे दर वाढले नव्हते. मात्र दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रती लिटर 35 पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल दर 97.34 रुपयांवर पोहोचलं आहे, तर डिझेलचे दर 88.44 रुपये झाले आहे.
वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारी 2021 रोजी राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 83 .71 रुपये होती तर डिझेलची किंमत 73.87 रुपये होती. पण आज 23 फेब्रुवारी 2021 रोजी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 90.97 रुपये आणि डिझेलची किंमत 81.36 रुपये आहे. म्हणजेच यावर्षी सुरुवातीच्या 54 दिवसात दिल्लीत एक लिटर पेट्रोल 7.22 रुपये आणि डिझेल 7.45 रुपयांनी महाग झाले आहे.