सोलापूर प्रतिनिधी – अक्कलकोट तालुक्यातील तडवळमध्ये खानापूरचे उपसरपंच दस्तगीर पटेल यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत तडवळ येथील रॉयल जीन्स कॉर्नरसमोर जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी सैपन पटेल म्हणाले कि, छत्रपती हे धर्मनिरपेक्ष राजे होते.त्यांच्या राज्यात सर्वांना समान न्याय होता.व महाराजांनी सर्वसामान्य असणाऱ्या सैनिकांना सोबत घेवून रयतेचे राज्य स्थापित करुन जगालाच एक आदर्श निर्माण करून दिले आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव कोणता असेल तर ते छत्रपती राजे यांचा जन्मदिवस म्हणजे जयंती .असे पटेल यांनी सांगितले.या कार्यक्रमाला अनेक शिवप्रेमींनी उपस्थिती दर्शवली.
यावेळी ता.अक्कलकोट शिवसेना तालुका उपप्रमुख सैपन पटेल, खानापूरचे उपसरपंच दस्तगीर पटेल, शाहनवाज पटेल,संतोष रत्नाकर, रियाज वडकबळ,हणमंत कुंभार,साबिर मकानदार,रमेश दनड़गुले,मोहन सुर्वे आदी उपस्थित होते.